Home > Latest news > बेकायदेशीर फेरफार व विक्री करणाऱ्या निशा साठे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा.

बेकायदेशीर फेरफार व विक्री करणाऱ्या निशा साठे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा.

Take action against the officer concerned, including Nisha Sathe, who is making illegal alterations and sales.

बेकायदेशीर फेरफार व विक्री करणाऱ्या निशा साठे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा.
X


शेतकरी भदुजी गूजबराव शिंदे यांची पत्रकार परिषदेत मागणी, बंटी भांगडीया यांच्या भावाने घेतली विवादीत जमीन.

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मौजा येन्सा येथील भुमापन क्रमांक 156 आराजी 5.51 शेत जामीन निशा साठे या महिलेने तहसीलदार कोळपे व उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत संगनमत करून ती परस्पर आमदार बंटी भांगडीया यांच्या श्रीकांत नावाच्या भावाला विकली व शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा प्रयत्न केल्याने पीडित शेतकरी भदुजी गूजबराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व मनविसे शहर उपाध्यक्ष पियुष धूपे उपस्थित होते.

शेतकरी भदुजी गूजाबराव शिंदे यांच्या रुख्मी गूजाबराव शिंदे या आईच्या नावे असलेली मौजा येन्सा भुमापन क्रमांक 156 आराजी 5.51 हे आर जमिनीवर मागील 56 वर्षापासून ते व त्या अगोदर त्यांचे वडील शेती करत आहे. दरम्यान एका जुन्या सन 1951 च्या कागदी व्यवहाराला ग्राह्य धरून सन 2020 ला तत्कालीन तहसीलदार रमेश कोळपे यांच्या सोबत संगनमत करून गैर अर्जदार निशा साठे हिने त्या जमिनीचा बेकायदेशीर फेरफार केला. सदर फेरफार च्या विरोधात शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्याकडे अपील केली होती पण तिथे सुद्धा निशा साठे या महिलेने संगनमत केल्याने तहसीलदार यांचा फेरफार आदेश कायम ठेवण्यात आला. त्यामुळे सदर आदेशाविरोधात शेतकरी हा जिल्हाधिकारी कार्यालयात अपीलमधे गेला असतांना सुद्धा न्यायप्रविष्ट प्रकरण असतांना त्या दरम्यान केली होती दिनांक 6/12/2021 ला आमदार बंटी भांगडीया यांचा भाऊ व माजी आमदार मितेष भांगडीया यांचा मुलगा श्रीकांत मितेष भांगडीया व दीपक उराडे यांच्या नावाने निशा विलासराव साठे यांनी मौजा येन्सा भुमापन क्रमांक 156 आराजी 5.51 पैकी 4.88 हे आर जमीन विक्री करून दिली.

वडिलांपासून मागील 56 वर्षात जमिन वाहत असलेल्या शेतकऱ्याचा तिथे कब्जा आहे परंतु तत्कालीन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत संगनमत करून माझ्या आईच्या नावे सन 2019 पर्यंत असलेल्या जमिनीची त्या महिलेने परस्पर विक्री केल्याने व मला जीवे मारण्याची धमकी गैर अर्जदार महिलेकडून सतत मिळत असल्याने या प्रकरणी चौकशी करून तत्कालीन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या वर कारवाई करावी व गैर अर्जदार महिला निशा साठे हीचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मला माझ्या न्यायासाठी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागेल व त्या दरम्यान मला कमीजास्त झाल्यास तत्कालीन तहसीलदार रमेश कोळपे, उपविभागीय अधिकारी शिंदे व निशा साठे ही महिला जबाबदार राहणार असा इशारा शेतकरी भदुजी शिंदे यांनी दिला आहे. सदर आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार विभागीय आयुक्त नागपूर व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना दिले आहे.

Updated : 9 Feb 2022 3:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top