तब्बल २७ किर्तनांमधुन करणार शहाजापुरचे युवक "माऊलींच्या हरीपाठाचे" निरुपण
Tabbala 27 kirtanāmmadhuna karaṇāra śahājāpuracē yuvaka"mā'ūlīn̄cyā harīpāṭhācē" nirupaṇa
X
तब्बल २७ किर्तनांमधुन करणार शहाजापुरचे युवक "माऊलींच्या हरीपाठाचे" निरुपण
सुरेगाव: जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे भगवतगीतेचे ज्ञान माऊलींनी हरीपाठाद्वारे सर्वसामान्यांच्या वाणीत आणले अशा माऊलींच्या हरीपाठातील २७ अभंगाचे निरुपण किर्तनाद्वारे करण्याचा संकल्प शहाजापुर येथील भागवताचार्य ह.भ.प.कैवल्य महाराज जोशी,ह.भ.प.योगेश महाराज शिंदे,ह.भ.प.संतोष महाराज लोणारे व सुरेगाव येथील जनार्दन महाराज गोंडे यांनी केला आहे.शहाजापुर येथे नजीकच्या काळात भव्य हनुमान मंदिर व सभामंडप उभारणी गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून झाली आहे.या मंदिराच्या आवारात ही किर्तनमालिका प्रत्येक द्वादशी ला सुरु आहे.ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग, ह.भ.प.नितीन महाराज भोसले यांचे गायन व ह.भ.प.शंभु महाराज लाड यांचे पखवाज वादन हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.यात अजुन दुग्धशर्करा योग असा की *शहाजापुरचे भुमिपुत्र ज्यांनी कोळपेवाडी परीसराचे नाव महाराष्ट्रभर गाजवले असे,वारकरी दर्पन चे संपादक ह.भ.प.सचिन महाराज पवार* यांची किर्तन सेवा या द्वादशी ला म्हणजे शनिवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ८ वाजता होणार आहे.या २७ किर्तनांच्या मालिकेतील ही नववी किर्तन सेवा आहे.या सर्व किर्तन सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शहाजापुर येथील ग्रामस्थांनी केले आहे....... *.हरीपाठ कीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥*