Home > Latest news > घरगुती पाणी करची आकारणी कमी करून गरीब जनता ची लुट थांबवावी ...

घरगुती पाणी करची आकारणी कमी करून गरीब जनता ची लुट थांबवावी ...

एम.आय.एम पक्षाची मागणी..

घरगुती पाणी करची आकारणी कमी करून गरीब जनता ची लुट थांबवावी ...
X

पुसद : स्थानिक ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन च्या वतीने उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी न.प.एका निवेदाद्वारे घरगुती पाणी कर आकारणी कमी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की आपण ३१३ रुपये दरमहा केलेली आहे.तर याबाबत धरणापासून ते पाणी फिल्टर ते संपूर्ण गावात सर्व पाईप लाईन हे शासना कडून व शासनाने दिलेल्या निधीतून लावण्यात आलेली असून यावर देखरेख अधिकान्या पासून ते कर्मचाऱ्यांना सुध्दा देखील पगार हे शासनच देत आहे व हे असतांना आपण गरीब लोकांकडून जास्ती घरगुती पाणी कर वसुली करीत आहे. आपल्याला सर्व खर्च शासन देत असतांना सुध्दा देखील आपण गरीब नागरीककाडून जास्त घरगुती पाणी कराची वसुली कशासाठी करीत आहे हे घरगुती पाणी कराची कर नसून दरमहा पन्नास रुपये करण्यात यावी. कारण न.प.ला फक्त विद्युत बिलाचाच खर्च आहे.पुसद करीता घरगुती पाणी कर फक्त पन्नास रुपये दरमहा करण्यात यावा ही विनंती अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला आपल्या कार्यालया समोर जन आंदोलन किंवा न्यायलयीन धाव घ्यावी लागेल.यास सर्वस्वी आपणच जबाबदार राहील.कृपया याची नोंद घ्यावी निवेदन सादर कर त्या वेळी सैय्यद सिद्दिकोद्दिन तालुकाध्यक्ष, कृष्णा जाधव युवक उपाध्यक्ष मराठवाडा यवतमाळ वाशिम,अमजद खान शहराध्यक्ष,फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष, जिया उल हक तालुका महासचिव, मोहम्मद जिब्रान शहर सचिव,फहेद अहेमद,मिर्झा आदील बेग प्रवक्ते अन्य मजलीस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.Updated : 22 Sep 2022 1:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top