Home > Latest news > वाशिम ते मुंबई शताब्दी एक्सप्रेस नियमित सुरु करा - राम ठेंगडे

वाशिम ते मुंबई शताब्दी एक्सप्रेस नियमित सुरु करा - राम ठेंगडे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना निवेदन

फुलचंद भगत

वाशिम - येथून मुंंबईला जाणार्‍या प्रवाशांचे होत असलेले हाल व आर्थिक नुकसान पाहता वाशिम ते मुंबई ही शताब्दी एक्सप्रेस नियमित सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे शहर उपाध्यक्ष राम ठेंगडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांची १६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान ठेंगडे यांनी ना. दानवे यांच्यासोबत रेल्वेच्या विविध समस्यांसोबत मिटर गेज व ब्रॉडगेजच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. गेल्या तीन महिन्यापासून एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांच्या गैरसोयीचा फायदा उचलून खाजगी वाहनधारक अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारुन प्रवाशांची लुट करीत आहेत. वाशिम जिल्ह्यातून अनेक नागरीकांना महत्वाच्या कामासाठी मुंबईला जाणेयेणे करावे लागते. त्यामुळे वाशिम ते मुंबई ही शताब्दी एक्सप्रेस नियमितपणे सुरु केल्यास प्रवाशांना त्याचा मोठा लाभ होईल तसेच रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल. त्यामुळे या बाबीवर विचार करुन कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी राम ठेंगडे यांनी ना. दानवे यांना निवेदन देवून केली. यावर ना. दानवे यांनी सहमती दर्शवून आपण जिल्हावासीयांच्या या महत्वाच्या प्रश्नावर लक्ष घालु असे आश्वासन त्यांनी दिले.

Updated : 17 Feb 2022 6:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top