स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ येथे स्पिन-ए-यार्न स्पर्धा यशस्वी
Spin-A-Yarn Competition Successful at School of Scholars, Yavatmal
X
प्रतिनिधी यवतमाळ
स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ आयोजित स्पिन-ए-यार्न आर्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे कोविड -19 साथीच्या परिस्थितीमुळे फेस बुकवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. या स्पर्धेत अकरा संघांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. स्पर्धेची थीम 'भारत की आझादी का अमृत महोत्सव तसेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे अनसंग वॉरियर्स' ही होती. ज्या अंतर्गत सर्व सहभागी संघांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांवर अभिनय केला. ही थीम स्पर्धकांना स्पर्धेच्या दिवशी देण्यात आली होती. तयारीसाठी केवळ दोन तास हातात असताना, संघांनी अप्रतिम कथा, अप्रतिम रंगमंच आणि मन मोहून टाकणारा अभिनय सादर केला ज्याने प्रेक्षक आणि परीक्षकांना प्रभावित केले. या स्पर्धेचा पहिला विजेता स्कूल ऑफ स्कॉलर्स, वानाडोंगरी, नागपूर आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स, बेलतरोडी यांनी दुसरा क्रमांक पटकावला. श्रीमती लुबैना अली – स्कूल नेट प्रा.लि. च्या शैक्षणिक समन्वयक, श्री. रंजन टोंगो- यवतमाळ शहरातील नाट्य क्षेत्रातील एक प्रसिद्ध कलाकार या स्पर्धेचे परीक्षक होते. शाळेच्या इंग्रजी विभागातर्फे विभागप्रमुख सौ.मयुरी योगेश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कॉलर आस्था पम्पत्तीवार, स्कॉलर आर्या जोशी आणि स्कॉलर अनुष्का पागरुत यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.नरेंद्रसिंह चव्हाण, उपमुख्याध्यापिका कु.रिना काळे आणि प्रशासकीय अधिकारी श्री.कृणाल वाघमारे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विभागाचे कौतुक केले.