Home > Latest news > सासरी परत जाणाऱ्या नव्वधुसह 6 जन जागीच ठार

सासरी परत जाणाऱ्या नव्वधुसह 6 जन जागीच ठार

Six people, including the bride, were killed on the spot

सासरी परत जाणाऱ्या नव्वधुसह 6 जन जागीच ठार
X

उमरखेड, जनसंग्राम वृत्तसेवा : तीन दिवसापूर्वी विवाह झालेली नववधू माहेरी परतणीचा कार्यक्रम करून सासरी जात असताना झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी भोकरजवळ घडली.

महिंद्रा मिनी व्हॅन आणि ट्रकची धडक झाल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. अपघातातातील जखमी व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.भोकर - हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर सोमठाणाजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.अपघातातील जखमींना नांदेड व भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील युवतीचा विवाह तीन दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यातील साखरा येथील युवकासोबत झाला होता. परतणीचा कार्यक्रम आटोपून नातेवाईकांसह महिंद्रा मॅक्झिमो मिनी व्हॅनमधून (एम.एच.19 एआर 3219) पररत असताना समोरून येणार्‍या ट्रकची (एम.एच.04 एएल 9955) व्हॅनला धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडल्यासारखे चित्र होते. मरण पावलेल्यांचे हात पाय तुटून पडले होते. या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली गेल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाहनांना बाहेर काढण्यात आले.

Updated : 21 Feb 2022 7:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top