Home > Latest news > 10 रूपयाचे नाणे घेण्यास दुकानदारांचा विरोध – बँकाही स्विकारण्यास तयार नाहीत पांढरकवड्यात होतोय राजमुद्रेचा अवमान –

10 रूपयाचे नाणे घेण्यास दुकानदारांचा विरोध – बँकाही स्विकारण्यास तयार नाहीत पांढरकवड्यात होतोय राजमुद्रेचा अवमान –

Shopkeepers oppose taking Rs 10 coin - Banks are not ready to accept it.

10 रूपयाचे नाणे घेण्यास दुकानदारांचा विरोध – बँकाही स्विकारण्यास तयार नाहीत पांढरकवड्यात होतोय राजमुद्रेचा अवमान –
X

10 रूपयाचे नाणे न स्विकारणा­यांवर कारवाई होणार

10 रूपयाचे नाण्याबाबत नागरिक संभ्रमात

20 रुपयाचे नाण्याचीही हीच गत होणार का ?

ग्राहक पंचायतची प्रशासनाकडे पुनश्च तक्रार

विशेष प्रतिनिधी /15 फेब्रु.

सुपर भारत वृत्तसेवा

………………………………

पांढरकवडा- पांढरकवडा शहरात सरेआम राजमुद्रेचा अवमान होत असून बँकांनी व प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाल आहे. 10 रूपयाचे नाणे स्थानिक दुकानदार स्विकारण्यास चक्क नकार देत असून बँकाही 10 रूपयाचे नाणे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे हे नाणे बंद झाल्याची अफवा शहरात पसरली आहे. त्यामुळे आता नागरिकही हे नाणे एकमेकांकडून स्विकारत नसल्याने ते शहरात चक्क चलनातून बाद झाल्याचे दिसत आहे.

10 रूपयाचे नाणे पांढरकवडा येथून 70 किमी अंतरावर असलेल्या हिंगणघाट, 150 किमी अंतरावर असलेल्या नागपूर व 170 किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथे चालते वर्धा जिल्ह्यातही हे नाणे सर्वच जण स्विकारतात. मात्र पांढरकवडा बाजारपेठेत 10 रूपयाचे नाणे कोणी स्विकारण्यास तयार नाहीत.

दुकानदार चक्क नाणे चालत नाही म्हणून घेत नसून स्थानिक बँकाही खातेदारांकडून हे नाणे स्विकारत नाही याबाबत बँकांशी संपर्क साधला असता हे नाणे चलनात रहावे म्हणून आम्ही स्विकारत नसल्याची स्पष्टोक्ती बँकांनी दिली व नाणे चलनातून बाद झाले नसून ते चलणात आहे नाणे बंद झाल्याचे कोणतेही आदेश रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र शहरातील दुकानदार ग्राहकांकडून हे नाणे स्विकारण्यास नकार देत आहे. अनेकांचे 10 रूपयांचे नाण्याचे रूपात मोठा पैसा असूनही तो अनेकांकडे तसाच पडून आहे काही जणांनी तर चक्क मोडीत ही नाणी दिल्याचा प्रकार ऐकावयास मिळाला आहे. पांढरकवडा शहरात राजमुद्रेचा सु डिग्री असलेल्या या अवमानास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

20 रूपयाचे नाणे चलनात

10 रूपया पाठोपाठ 20 रूपयाचे नाणेही चलनात आले आहे ते मात्र व्यवहारात स्विकारल्या जात आहे. मात्र काही दिवसांनी या नाण्याचीही हीच गत होण्याची शक्यता बाळगून आतापासूनच ग्राहक हे नाणे बँकांकडून घेण्यात कुचराई करीत आहे. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. 10 रूपयाचे नाणे बाबत अधिक माहिती घेतली असता 10 रूपयाचे नाणेही चलनात असून याबाबत प्रशासनाने वेळोवेळी वत्तपत्रातून खुलासा दिला आहे. ग्राहकांनी ते घ्यावे असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. व तक्रार आल्यास कारवाई करू असा ईशारा दिला आहे.

बँकांनी बँकेत सुचना फलक लावावा

10 रूपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्विकारावे अशा सुचनांचे फलक सर्व बँकांनी व पतसंस्थानी आपआपल्या बँकेत लावल्यास ग्राहकांमधून चुकीचा संभ्रम दुर होईल असे मत ग्राहक वर्गाने व्यक्त केले आहे.

10 रूपयाचे नाणे चलनातच – आर.बी.आय.

10 रूपयाचे नाणे चलनात असल्याचे आरबीआय ने स्पष्ट केले असून ते सर्वांनी स्विकारावे असे आरबीआय ने म्हटले आहे त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 14448 आरबीआय ने जारी केला असून या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5.15 पर्यंत नागरीक कॉल लावून समाधान करून घेऊ शकतात असे आरबीआय ने म्हटले आहे.

कारवाई पासून वाचण्यासाठी ग्राहक पंचायतचे पांढरकवडा शहरातील सर्व व्यापा­यांना नाणे स्विकारण्याचे आवाहन

10 रूपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी स्विकारावे व दुकानदारांकडून ग्राहकांनी स्विकारावे असे आवाहन ग्राहक पंचायतचे अध्यक्ष विवेक अंगाईतकर यांनी म्हटले आहे रिझर्व बँकेने बँकांमधील ग्राहकांनी नाणे ठेवण्यासाठी कोणतिही मर्यादा ठेवलेली नाही बँका त्यांच्या ग्राहकांकडून कितीही नाणी स्विकारण्यास स्वतंत्र आहे . असेही अंगाईतकर यांनी म्हटले आहे. 10 रूपयाचे नाणे हे रिझर्व बँकेने जाही केलेले कायदेशीर टेंडर आहे आणि ते स्विकारण्यास अयशस्वी होणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. व्यापारी नाणी का स्विकारीत नाहीत माहिती नाही, लोकांना याबाबत काही समस्या आल्यास ते कोणत्याही पोलीस स्टेशनला व्यावसायीक आस्थापनांविरूध्द त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. असेही विवेक अंगाईतकर यांनी म्हटले आहे.

Updated : 15 Feb 2022 7:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top