Home > Latest news > आरटीओकडून विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या 32 वाहनांचा जाहीर लिलाव

आरटीओकडून विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या 32 वाहनांचा जाहीर लिलाव

Seized by RTO under various sections Public auction of 32 vehicles

चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या लिलावाद्वारे 32 वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरतर्फे मोटार वाहन कर कायदा 1958 मधील विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल कर संहिता 1966 नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये आहे त्या स्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे हा लिलाव होणार आहे.

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी लिलाव (नापरतावा) नोंदणी शुल्क रु. 2400 (दोन हजार चारशे) व खबरदारी ठेव रक्कम (परतावा) 1,02,250 (एक लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपये) कार्यालयात डी.डी.द्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर या नावाने जमा करावे. लिलावाची अधिक माहिती www.eauction.gov.in या संकेतस्थळावर बघता येईल. तसेच लिलावामध्ये विक्री करावयाच्या वाहनांची यादी, लिलावाचा दिनांक, ठिकाण तसेच अटी व शर्ती आदीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव/विक्री रद्द करावयाचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी,चंद्रपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

Updated : 2 Oct 2022 12:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top