Home > Latest news > महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरावे

महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरावे

१५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरावे
X

फुलचंद भगत

वाशिम: अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण फी, परीक्षा फी, योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांतील अर्ज स्विकारण्यासाठी महाडिबीटी पोर्टल हे १४ डिसेंबर २०२१ पासुन नविन प्रवेशित व नुतनीकरणाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी कार्यान्वीत करण्यात आले आहे.

सन २०२१-२२ या वर्षातील अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.govin या संकेतस्थळावर भरुन घ्यावे. महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ या सत्रातील महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे नुतनीकरणाचे अर्ज भरण्याची अंतीम मुदत १५ फेब्रुवारी २०२२ आहे. नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची अंतीम मुदत १५ फेब्रुवारी २०२२ आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावरुन कळविण्यात यावे. महाविद्यालयांनी सन २०२१-२२ या वर्षीकरीता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणीकृत होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष दयावे. जिल्हयातील सर्व प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना या योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्याबाबत कळवावे.

जिल्हयातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आवाहन करण्यात येते की, आपल्यास्तरावरुन अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास कळवून तसेच महाडिबीटी पोर्टलच्या https://dbtworkflow.mahadbtmahait.govin या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रिशीप) योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम यांच्याकडे तात्काळ पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसुल केल्यास संबंधित महाविद्यालय कारवाईस पात्र राहील. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी कळविले आहे.

Updated : 2 Feb 2022 7:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top