सतनाम बेकरी वाल्याची ग्राहकास मारहाण खरेदी केलेल्या लाडूतुन बालकास विषबाधा
Satnam Bakery Wala's customer beaten Poisoning a child with purchased laddu
X
पुसद शहरातील बसस्थानकासमोरील सतनाम बेकरी मधून दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ग्राहक अशोक राठोड रा इटावा वॉर्ड पुसद यांनी मुलांसाठी बुंदीचे लाडू खरेदी केले. खरेदी केलेले लाडु घरी गेल्यानंतर त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाने खाल्ले व त्याने काही वेळातच उलट्या करणे सुरु केले. यामुळे घाबरलेल्या त्याच्या आईने ही बाब बालकाच्या वडीलास सांगितली यासंदर्भात लाडू खाल्ल्याने विषबाधा झाल्यामुळे अशोक राठोड हे सतनाम बेकरी येथे गेले व झालेला प्रकार दुकान मालकास सांगितले असता सतनाम बेकरीच्या मालकाने अशोक राठोड यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. व माझ्या सतनाम बेकरीची बदनामी केल्यास तुला पुसद शहरात राहणे मुश्किल करील अशी धमकी दिली. या घटनेनंतर अशोक राठोड यांनी वसंत नगर पोलीस स्टेशन गाठून सतनाम बेकरीचे मालका विरोधात 504,506 कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवीला.
नियमाने मिठाईच्या दुकानात बेस्ट बेफोरचे लेबल लावणे अनिवार्य आहे. मी सतनाम बेकरी मधून बुंदीचे लाडू खरेदी करतांना त्या लाडूवर बेस्ट बिफोर चे लेबल नव्हते. मी त्याबद्दल मालकास विचारणा केली असता लाडू ताजे आहेत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी ते लाडू खरेदी केले माझ्या तीन वर्षांच्या बळाने लाडू खाल्ल्या नंतर लगेच उलट्या करण्यास सुरुवात केली ही बाब मी दुकान मालकास सांगितली असता त्यानी मला मारहाण केली. गुन्हा नोंदविल्या नंतर पोलिसांनी ते लाडू त्यांच्या ताब्यात घेतले आहे.
अशोक राठोड ग्राहक