Home > Latest news > यवतमाळ शहरातील सराईत गुन्हेगार टोळीला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत केले यवतमाळ जिल्हयातुन तडीपार

यवतमाळ शहरातील सराईत गुन्हेगार टोळीला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत केले यवतमाळ जिल्हयातुन तडीपार

Sarait criminal gang in Yavatmal city was arrested from Yavatmal district under Maharashtra Police Act

यवतमाळ शहरातील सराईत गुन्हेगार टोळीला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत केले यवतमाळ जिल्हयातुन तडीपार
X

यवतमाळ शहरातील सराईत गुन्हेगार टोळीला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत केले यवतमाळ जिल्हयातुन तडीपार


पो.स्टे. यवतमाळ शहर हददीतील सागवान कुटुंबीय व त्यांचे पाठीराखे टोळीने परीसरात दहशत रहावी म्हणुन गुन्हे करण्याचा अभिलेख आहे. यात प्रामुख्याने टोळी प्रमुख १) सलीम शहा सुलेमान शहा वय वय ५८ वर्षे, २) शहेजाद शहा सलीम शहा वय ३२ वर्षे, ३) शकील शहा सलीम शहा वय २८ वर्षे सर्व राहणार अलकबीर नगर यवतमाळ यांचे गुन्हेगारी कुत्यांमुळे परीसरात राहणारे सामान्य नागरीकांना भय निर्माण झाले असुन त्यांनी सतत शरीराविषयक गुन्हे करण्याचे कुत्य करुन सार्वजनिक सुव्यवस्था व शातंता भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर टोळीला महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ५५ (१) अन्वये तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक पो.स्टे. यवतमाळ शहर यांनी तयार करुन हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेकडे मंजुरी करीता सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास हददपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी दिनांक २५/०५/२०२३ रोजी मान्यता देवुन सागवान टोळीतील वरीलप्रमाणे सदस्यांना यवतमाळ जिल्हयातुन ०३ महीन्याकरीता तडीपार करण्याचे आदेश पारीत केले.

आदेश प्राप्त होताच पोस्टे यवतमाळ शहर यांचेमार्फत सागवान टोळीतील टोळी प्रमुख १) सलीम शहा सुलेमान शहा व वय ५८ वर्षे, २) शहेजाद शहा सलीम शहा वय ३२ वर्षे, ३) शकील शहा सलीम शहा वय २८ वर्षे सर्व राहणार अलकबीर नगर यवतमाळ यांना आदेश तामील करुन त्यांना यवतमाळ जिल्हयातुन निघुन जाण्यास सांगण्यात आले आहे.


यापुढेही अशा स्वरुपाचे शांतता भंग करणारे, शरीराविरुध्द व संपत्तीविरुध्द गुन्हे करणारे, धोकादायक गुन्हेगार तसेच वाळु तस्करी, गावठी हातभट्टी दारु विषयक गुन्हेगारांविरुध्द एम. पी. डी.ए, मकोका, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी अशा गुन्हेगारांची जंत्री गोळा करणे सुरु असुन भविष्यात अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कारवाई प्रस्तावीत आहेत.

सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदिप परदेशी पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा. यवतमाळ, श्री. नंदकुमार पंत, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. यवतमाळ शहर, सपोनि जनार्धन खंडेराव पो.स्टे. यवतमाळ शहर, पोउपनि धनराज हाके, राजेश तिवारी, पोहवा बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघट सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Updated : 26 May 2023 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top