Home > Latest news > सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता लोकचळवळ व्हावी : महापौर राखी कंचर्लावार

सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता लोकचळवळ व्हावी : महापौर राखी कंचर्लावार

Sanitation should be a people's movement for good health: Mayor Rakhi Kancharlawar


स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरित

चंद्रपूर : जीवन जगताना प्रत्येकवेळी आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थित नसेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण एका छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, झोन सभापती छबू वैरागडे, सहायक आयुक्त विद्या पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी महापौर म्हणाल्या, महात्मा गांधींनी "स्वच्छ भारत" चे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी स्वच्छ भारत अभियानची सुरवात केली. स्वच्छता म्हणजे केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी न राहता ते स्वतःसह आणि समाजाच्या आरोग्यसाठी एक चळवळ होण्याची गरज आहे. चंद्रपूर शहर सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत इम्पॅक्ट ऑफ स्वच्छ भारत मिशन कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. यामध्ये चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान देणार्‍या एकूण 25 नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी बेस्ट 5 जणांना उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आहेत. यामध्ये आरोग्य क्षेत्रातून डॉ. स्नेहल पोटदुखे, स्किल डेव्हलपमेंट एज्यूकेशन मधून नागेश नित, योगा प्रशिक्षक मधून स्मिता रेबनकर, होम कंपोस्टिंग अवरेनेससाठी सुवर्णा लोखंडे, ट्री प्लांटेशन अँड मेडिकल कॅम्पसाठी डॉ. सिराज खान यांचा समावेश आहे.
आयडेंटिफिकेशन अंड रेकॉग्निशन ऑफ चॅम्पियन्स या स्पर्धेत स्वच्छता कर्मचारी, वार्ड नगरसेवक, सीएसआर लीड, एन जी ओ प्रतिनिधी यांचा सहभाग होता. स्पर्धेत पाच पुरुष आणि पाच महिला गटातून पुरस्कार देण्यात आले. पुरुष गटातून संतोष गर्गेललवार, सुभाष कासनगोटूवार, देवानंद साखरकर, विवेक पोतनुरणार, महेंद्र राडे यांचा समावेश आहे. महिला गटातून छबुताई वैरागडे, रोशनी तपासे, मोनिका जैन, शारदा हुसे, वर्षा आत्राम यांना देण्यात येईल.

स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज कॉम्पिटिशनमध्ये विविध संस्थांनी सहभाग घेतलेला होता. यामध्ये सिपेट कॉलेजचे अभिषेक सिंग, सोनाली चांदे तसेच उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्था वैशाली साखरकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बेस्ट 2 इनोव्हेटिव्ह मध्ये यांची निवड झालेली आहे.

याशिवाय मार्केट असोशिएशनमधून गंज वॉर्ड मार्केट, टिळक बाजार, शैक्षणिक गटातून बीजेएम कार्मेल अकॅडेमी, बजाज विद्या भवन, विद्या विहार स्कुल, हॉस्पिटल गटातून डॉ. बेंडले हॉस्पिटल, डॉ. कोतपल्लीवार हॉस्पिटल, कोलते हॉस्पिटल, हॉटेल गटातून एनडी हॉटेल, ट्रायस्टार हॉटेल, सिद्धार्थ हॉटेल, कार्यालय गटातून पोलीस अधीक्षक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधीक्षक जिल्हा कारागृह यांचा समावेश आहे.

यावेळी सामाजिक गटातून रोटरीचे अविनाश उत्तरवार, ग्रामायणच्या प्रगती माढई, इनरव्हील क्लबच्या डॉ. शीतल बुक्कावार, लायन्स क्लबचे सुनील कुलकर्णी, लायन्स क्लब ऑफ क्वीन चंद्रपूर मंजू गोयल, शैलेश दिंडेवार यांचा समावेश आहे. या प्रसंगी पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे डॉ. बालमुकुंद पालीवाल, प्रदूषणाविरुद्ध लढा देणारे चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, कोरोना काळात सेवा दिल्याबद्दल शिव मोक्षधाम स्मशानभूमी संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्याम धोपटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. श्रीकांत जोशी, मनीषा पडगिलवार, नीरज वर्मा, राजेश्वरी किल्लन मनोरंजन, शर्मिली पोद्दार यांचाही सत्कार करण्यात आला.

दरम्यान, पाहुण्यांचे स्वागत स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जयश्री मुळे यांनी केले.

Updated : 29 Jan 2022 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top