Home > Latest news > विदर्भ मराठवाड्यावर असलेल्या पैनगंगा नदी पात्रातून दिवसाढवळ्या रेती तस्करी जोमात..

विदर्भ मराठवाड्यावर असलेल्या पैनगंगा नदी पात्रातून दिवसाढवळ्या रेती तस्करी जोमात..

Sand smuggling is in full swing from Panganga river bed on Vidarbha Marathwada.

विदर्भ मराठवाड्यावर असलेल्या पैनगंगा नदी पात्रातून दिवसाढवळ्या रेती तस्करी जोमात..
X

म मराठी न्यूज नेटवर्क

विदर्भ मराठवाडावर असलेल्या पैनगंगा नदी पात्रातून दिवसाढवळ्या अवैधरित्या रेती तस्करी मोठ्या जोमात सुरू असून करोडो रुपयाचा शासनाचा महसूल नदीपात्रात बुडताना दिसून येत आहे याकडे शासकीय अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे तसेच माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीवर टाकळी रेती घाटावर दिवसा ढवळ्या आठ ते दहा ट्रॅक्टर मजुरांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरून नेत आहे याकडे माहूरचे तहसीलदार किशोर यादव हे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे तर एकीकडे विदर्भ बॉण्ड्री वर असलेला मुकिंदपुर व साकूर रेती घाट येथून मोठ्या प्रमाणात अवैध रीती रेती उत्कलन सुरू आहे. आर्णीचे तहसीलदार परशुराम भोसले हे कारवाई का करत नाही त्याच्यावर नागरिकांची लक्ष लागले आहे तर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या संबंधित अधिकाऱ्यांवर लक्ष घालून तालुक्यात होणारी रेती तस्करी थांबवून ह्या रेती तस्करांच्या मुचक्या आवरण्याची आवश्यकता आहे..


प्रतिक्रिया

तहसीलदार साहेबांसोबत मी व इतर कर्मचारी घेऊन आम्ही रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग ला जातो पण तेव्हा काही आम्हाला नदीपत्रात रेती उत्कलन करताना आढळलेले नाही आम्ही टाकळी येथील एका शेतातील स्टॉक केलेली रेती जप्त केली.व आम्ही सर्वच रेती घाटावर देखरेख रात्रीच्या वेळी दिवसाच्या वेळी करत आहोत.

तलाठी हेंडगे टाकळी ता. माहूर

Updated : 24 Nov 2022 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top