Home > Latest news > लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Saddened by the demise of Lata Mangeshkar Monday declared a public holiday in the state

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा    सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
X

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

मुंबई दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

Updated : 6 Feb 2022 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top