Home > Latest news > शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर, काय आहे नियमावली❓ वाचा ‼️

शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर, काय आहे नियमावली❓ वाचा ‼️

Rules for celebrating Shiva Jayanti announced, read the rules ❓

जाकीर हुसेन - 9421302699

म मराठी❗ अपडेट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.‼️

आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे.

दरम्यान, तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योत आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

Updated : 15 Feb 2022 10:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top