Home > Latest news > शनिवारी कार्ली (पोड) येथे ईनामी काटा कुस्त्यांची दंगल.

शनिवारी कार्ली (पोड) येथे ईनामी काटा कुस्त्यांची दंगल.

Riot of prize kata wrestlers at Carly (Pod) on Saturday.

शनिवारी कार्ली (पोड) येथे ईनामी काटा कुस्त्यांची दंगल.
X

यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावरील कार्ली (पोड) येथे शनिवार दि २६ नोव्हेंबर रोजी भव्य ईनामी काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. स्व. नवसुजी जयराम एकनार व स्व. मदनबाबा देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ हनुमान आखाडा कार्ली(पोड) येथे दुपारी १ वाजता ह्या भव्य ईनामी काटा कुस्ती विराट दंगलीचे आयोजन पैलवान राजेश एकनार व पैलवान ऍड धनंजय लोखंडे यांनी केले आहे. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी मंदा खुरपुडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे व पीएसआय गोपाल उताणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कुस्ती दंगलीत राजस्थान, दिल्ली, मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणांहून नामवंत मल्ल सहभागी होणार असून विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट होणार आहे. या भव्य ईनामी काटा कुस्ती दंगलीचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Updated : 24 Nov 2022 5:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top