Home > Latest news > " विद्यार्थिनीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण"

" विद्यार्थिनीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण"

"Republic Day flag hoisting by a student"

 विद्यार्थिनीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण
X

ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे दरवर्षीच्या परंपरे नुसार शाळेतील टॉपर विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणे हा स्तुत्य उपक्रम शाळेच्या माध्यमातून राबविल्या जात आहे. विद्यार्थ्यांमधे अभ्यासाची स्पर्धात्मक रुची निर्माण करण्यासाठी तसेच या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधे प्रेरणा जागृत होऊन दरवर्षी शाळेच्या दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत असते. या वर्षी दहावी टॉपर कु. सायली कोहळे या विद्यार्थिनीला या वर्षाचा ध्वजारोहण करण्याचा बहुमान प्राप्त झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच मार्कंडेय पब्लिक स्कूल च्या माध्यमातून प्रस्तुत उपक्रमातून समाजातील तळागाळातील सर्वांनी एक प्रेरणा ठरत आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. संतोष कोकुलवार व संस्थेच्या संचालिका डॉ. शीतल बल्लेवार व शाळेचे सर्व शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आशिर्वाद दिले.

Updated : 26 Jan 2022 6:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top