Home > Latest news > छञपती शिवाजी महाराज स्मारकाच्या हद्दीतील अतिक्रमण काढा अन्यथा अंदोलन करु.

छञपती शिवाजी महाराज स्मारकाच्या हद्दीतील अतिक्रमण काढा अन्यथा अंदोलन करु.

Remove the encroachment within the boundaries of Chhapati Shivaji Maharaj memorial, otherwise we will agitate.

छञपती शिवाजी महाराज स्मारकाच्या हद्दीतील अतिक्रमण काढा अन्यथा अंदोलन करु.
X

नांदेड/माहुर.

तालुक्यातील वाई बाजार येथील राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या ग्राम पंचायत नियोजित स्मारकाच्या जागेत मोठ्या प्रमात अतिक्रम वाढले असून सदरील नियोजित जागेतील पंधरा दिवसात अतिक्रमण हटवा अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही आपल्या कार्यालयासमोर अंदोलन करु असा इशारा दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती उत्सव समातीने ग्राम पंचायत प्रशासनास निवेदनातून इशारा दिला आहे.

मौजे वाई बाजार येथील ग्राम पंचायत हद्दीतील मालमत्ता क्र.११७७ हि छञपती शिवाजी महाराज स्मारकाची नियोजित जागा आहे. सदरील नियोजित छञपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या परिसरात व ग्राम पंचायत हद्दीतील मोकळ्या भुखंडात मोठ्या प्रमाणात अतिक्रम वाढले आहे.दि.१९ फेब्रुवारी रोजी छञपती शिवाजी महाराज यांची या ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली होती,त्यावेळी स्मारकाची नियोजित जागा स्थानिकांनी अतिक्रमण करुण ताब्यात घेतल्याचे कार्यकमाप्रसंगी आलेल्या माण्यवरांच्या व उपस्थित मंडळीच्या लक्षात आल्याने त्यांनी शिव जयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांना झालेले अतिक्रम काढून सुशोभीकरण करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन केले.समितीच्या पदाधिकार्‍यांनी ग्राम पंचायत प्रशासनाला काल दि.२१ फेब्रु २०२२ ला २१ पदाधिकार्‍याच्या साक्षर्‍या असलेले निवेदन दिले.सदरील निवेदनात मालमत्ता क्र.११७७ मधील लांबी २५ तर रुंदी ३० फुट असलेल्या छञपती शिवाजी महाराज स्मारकाच्या परिसरात वाढलेले अतिक्रमण तात्काळ काढा व सी.सी टिव्ही कॅमेरे लावा.अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने अंदोलन करु असा इशारा देताच येथील ग्राम विकास अधिकारी पुंड यांनी तात्काळ स्मारक परिसरातील जागा मोजून घेतली व अतिक्रमण धारकांना लवकरच आदेशित करुण कार्यवाही करु व सी.सी टिव्ही कॅमेरे बसवू असे आश्वासन समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे,रघूविर कलाणे,शिवम कलाणे,सागर देवकर,राजु शिंदे,ओम अंजान यांच्यासह पदाधिकार्‍याला दिले.

Updated : 22 Feb 2022 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top