राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरात स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव कथन
Rādhābā'ī kāḷē kan'yā vidyā mandirāta svātantrya sainikācē anubhava kathana
X
राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरात स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव कथन
राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरात स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव कथन सुरेगाव:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपेवाडी मौजे सुरेगाव तालुका कोपरगाव येथे विविध कार्यक्रम साजरे होतात. यामध्ये 'स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत' या कार्यक्रमासाठी आज शनिवार दिनांक 12/ 2 /2022 रोजी माजी सैनिक राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित कॅप्टन विश्वनाथ जाधव यांना निमंत्रित करण्यात आले.
यानिमित्त प्रमुख अतिथी कॅप्टन जाधव यांनी विद्यार्थिनींना भारतीय सैन्यदलात कार्यरत असताना आलेले विविध अनुभव कथन केले. सर्व विद्यार्थिनी या उद्याच्या रणरागिनी कशा होतील, मुलगा-मुलगी यात भेद नसून त्यांना समान हक्क आहेत, शिक्षणासाठी परिस्थिती कधीही आडवी येत नाही फक्त आपली मानसिक इच्छाशक्ती महत्त्वाची हे पटवून त्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या काळातील स्त्रीचे महत्त्व पटवून देताना सर्व क्षेत्रातील कर्तबगार महिलांची उदाहरणे देऊन खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्या सौ काकडे छाया, पर्यवेक्षक श्री मोरे रमेश, ज्येष्ठ शिक्षक श्री खंडीझोड सुरेश, श्री मेढे रवींद्र, श्री नाईक सर, श्रीमती पाटील अनिता, आदी सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवक व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्कृतीक विभाग प्रमुख श्रीमती म्हस्के रोहिणी व आभार पर्यवेक्षक श्री मोरे रमेश यांनी केले