Home > Latest news > राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपेवाडी मौजे सुरेगाव या विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपेवाडी मौजे सुरेगाव या विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

Rādhābā'ī kāḷē kan'yā vidyā mandira kōḷapēvāḍī maujē surēgāva yā vidyālayāta śivajayantī sōhaḷā utsāhāta sājarā

राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपेवाडी मौजे सुरेगाव या विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.
X

राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपेवाडी मौजे सुरेगाव या विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.
सुरेगाव:

रयत शिक्षण संस्थेचे, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोळपेवाडी मौजे सुरेगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .

याप्रसंगी जुनियर कॉलेज विभागप्रमुख श्री काकडे अंगद यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक आदर्श नेतृत्व, एक आदर्श राजा म्हणून आजही जनसामान्यांच्या मनात घर करून आहेत. त्यांचे आचार- विचार आचरणात आणून एक आदर्श जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. स्वाभिमान,आत्मविश्वास व नैतिकतेच्या जोरावर अठरापगड जाती-जमातीतील मावळ्यांना एकत्र करून रयतेचं कल्याणकारी राज्य स्थापन करणारे विश्ववंदनीय छत्रपती शिवराय म्हणजे व्यक्ती नसून जीवन समृद्ध बनवणारा मार्गदाता आहे. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्यातील सर्वोच्च शिखरावर पोचण्यासाठी "शिवराय" अंगीकारणे हीच आधुनिक शिवनीती!

यावेळी प्राचार्या काकडे छाया, ज्येष्ठ शिक्षक खंडीझोड सुरेश, मेढे रवींद्र, शिंदे सोमनाथ, आभाळे प्रभाकर, झावरे शिवाजी, चौधरी राजेंद्र, पाटील अनिता व इतर सेवक वृंद उपस्थित होते.

मा. प्राचार्या सौ काकडे छाया यांनी शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व शेवटी श्रीमती म्हस्के रोहिणी यांनी सर्वांचे आभार मानले.

Updated : 20 Feb 2022 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top