श्रीरामपुर बुद्ध विहारात रमाई जयंती साजरी
Ramai Jayanti celebration at Shrirampur Buddha Vihara
X
राजेश ढोले/ पुसद प्रतिनिधी
पुसद येथील ग्रिनपार्क श्रीरामपुर येथील विश्वदीप महाबोधी बुद्ध विहारात त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्धीष्ट पेनशनर असोसिएशन यवतमाळ शाखा पुसदचे अध्यक्ष माजी प्राचार्य सुधाकर बनसोड, हे होते
प्रमुख अतिथी म्हणून प्रज्ञापर्वाचे संस्थापक अध्यक्ष, साप्ताहिक दलितांचा कैवारीचे संपादक बुद्ध भुषण भिमरावदादा कांबळे, सेवानिवृत्त तहसिलदार के.के.दिघाडे,से.नि. शिक्षक सी.एल.आठवले,योग शिक्षक ल.पुं.कांबळे, धम्मगुरू कमलधममो उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भंते कमलधममो यांनी बुद्ध वंदना घेतली.बुद्धभुषण भिमरावदादा कांबळे यांना नुकताच धम्म भुषण पुरस्कार मिळाला आहे यांचा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष साहेबराव गुजर यांनी शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सौ.सुरेखाताई भिमराव कांबळे यांचा सुजाता महिला मंडळाच्या रमाबाई दिघाडे, मंगलाताई गुढे, रत्नमाला शेंडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
यावेळी कमलेश पाटील यांनी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त गीत सादर केले.
सुजाता महिला मंडळाच्या जयाताई काळे,योगशिक्षक लक्ष्मण कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर बनसोड यांनी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जिवन कार्याची माहिती दिली.
बुद्धभुषण भिमरावदादा कांबळे यांनीही धम्मकार्याची माहिती दिली सत्काराला समर्पक उत्तर दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बुद्ध विहार समितीचे सचिव राधाकिसन गवई यांनी केले. तर आभारप्रदर्शन तुकाराम चौरे यांनी मानले..कार्यक्रमाला सुजाता महिला मंडळाच्या रत्नमाला शेंडे, रंजना आडोळे,जया काळे, मंगला गुढे, सुजाता दवने, शालिनी आळणे,सुनिता बहादुरे रमाबाई दिघाडे,एकता खोडके, बुद्ध विहार समितीचे प्रल्हाद खडसे,दिलीप कांबळे, भिमराव गायकवाड, दगडू कांबळे, तुकाराम चौरे, विजयराव स्थुल, प्रकाश आळणे,उपस्थित होते.