राहुलजी बजाज यांच्या निधनाने एका महान उद्योजकास देश मुकला - हंसराज अहीर
Rahulji Bajaj's death leaves a great entrepreneur - Hansraj Ahir
म मराठी न्यूज़ नेटवर्क | 12 Feb 2022 2:21 PM GMT
चंद्रपूर - बजाज उद्योग समुहाचे सर्वेसर्वा, राज्यसभेचे पूर्व खासदार पद्मभुषण राहुलजी बजाज यांच्या दुःखद निधनामुळे देशाच्या सामाजिक, राजकीय व उद्योगजगताची फार मोठी हानी झाली आहे. बजाज उद्योग समुहाने आपल्या कर्तबगारीने भारताची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर उंचावली आहे. अशा महान उद्योग समुहाच्या अध्यक्षांपैकी एक असलेल्या राहुलजी बजाज यांच्या निधनाने एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुडलेला यशस्वी उद्योगजकास देश मुकला आहे. माझे संसदीय कार्यकाळात राहुलजी बजाज यांचे राज्यसभेतील भाषणे ही देशाच्या औद्योगीक क्रांतीत भर घालणारी होती. अशा शब्दात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
Updated : 12 Feb 2022 2:21 PM GMT
Tags: #vidarbh #Fadnvis #Ahmadnagar #Chandrapur #sharadpawar #yogi Aditya #RahulGandhi #UdhavThakare #pradhanmantry
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire