Home > Latest news > श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सुरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचा समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सुरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचा समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Śrī chatrapatī śivājī vidyālaya surēgāva yēthē prajāsattāka dinācā samārōha mōṭhyā utsāhāta sājarā karaṇyāta ālā

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सुरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचा समारोह मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.
X

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सुरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचा समारोह मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.


श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सुरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचा समारोह मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.




दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयांमध्ये एनसीसी तसेच इयत्ता दहावी आणि बारावी चे विद्यार्थी , पालक ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित प्रजासत्ताक दिनाचा समारोह अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला . याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री सोनवणे के बी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले , प्राचार्य साहेबांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि इतिहास ओघवत्या भाषेत स्पष्ट करून सांगितला.


याप्रसंगी विद्यालयातील एनसीसी विभाग प्रमुख श्री मेहेरे बी एम यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विभागातील 100 कॅडेट्सचे दिमाखदार संचलन करण्यात आले. एन सी सी विभागातील 15 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी झालेल्या ए सर्टिफिकेट परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. याप्रसंगी या पंधरा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या समारोह साठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री जुंधारे सर यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील उपमुख्याध्यापक श्री कातकडे सर पर्यवेक्षक श्री तुपे सर आणि श्री कुदळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री मोरे सर आणि गांगुर्डे सर यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले. शासनाने घातलेल्या सर्व कोविड नियमांचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

Updated : 26 Jan 2022 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top