कोहिनूर सोसायटीत नियमित पाणीपुरवठा करा: नागरिकांची मागणी
Provide regular water supply to Kohinoor Society: Demand of citizens
X
यवतमाळ (वासीक शेख) : जल हे जीवन आहे आपण अनेकदा हे वाक्य ऐकले असेल परंतु जेव्हा हे जल मिळणारच नाही तर लोक जगणार कसे ? असेच या समस्येतून ग्रस्त कोहिनूर सोसायटी,गुलशन सोसायटी पांढरकवडा रोड यवतमाळ येथील नागरिकांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ येथे जाऊन उपविभागीय अभियंता निलेश साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की कोहिनूर सोसायटी हे वसाहत गेले पंचवीस-तीस वर्षांपासून आहे येथील नागरिक जीवन प्राधिकरणाचे जुने ग्राहक आहे परंतु येथील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा केला जात नाही आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे तसेच जेव्हा पाणी येतो तेव्हा बहुतांश घरांमध्ये पाणी दूषित येते तसेच नळ ची धार बारीक असल्याने येथील नागरिकांना पाण्याची साठवण करता येत नाही हे पाणी पुरवठा आठवड्यातून दोनदा करण्यात यावे तसेच दूषित पाण्यासाठी काही उपाय योजना करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे निवेदन देतेवेळी हाजी मुस्तफा,हाजी रशिद शेख,जमिल बाबु साहब,अतीक शेख,उजेर भाई,अबुजर शेख तसेच कोहिनूर सोसायटी,गुलशन सोसायटीतील समस्त नागरिक उपस्थित होते.