Home > Latest news > कारंजा नगरीत श्री नवदुर्गोत्सवाची जय्यत तय्यारी ! . . . . .

कारंजा नगरीत श्री नवदुर्गोत्सवाची जय्यत तय्यारी ! . . . . .

"मातृशक्ती उपासकांच्या आनंदाला आले उधाण !" . . .

कारंजा नगरीत श्री नवदुर्गोत्सवाची जय्यत तय्यारी ! . . . . .
X

कारंजा [लाड] : संपूर्ण भारतामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या, आसाम राज्यातील गोहाटी येथील श्री कामाख्या देवीचे प्रसिद्ध शक्तिपिठ असलेल्या कारंजा नगरीतील जागृत व ऐतिहासिक असलेल्या श्री कामाक्षादेवी मंदिरामुळे, मातृशक्ति उपासकांची नगरी म्हणून कारंजा नगरी सुप्रसिद्ध असून, प्रत्यक्ष श्री तुळजाभवानीचा अवतार म्हणूनही श्री कामाक्षादेवी ओळखल्या जात असते. अशा या नगरीतील श्री नवरात्रोत्सव आणि श्री नवदुर्गोत्सव हा मातृशक्ति उपासकांमध्ये सुप्रसिद्ध असून हिंदु धर्मियां सोबतच जैन धर्मिय, मारवाडी, गुजराती, सिंधी समाजाच्या माता बहिणी आणि बांधवही हा उत्सव आनंदाने साजरा करीत असतात. परंतु मागील दोन वर्षात कोव्हिड 19, कोरोना महामारीच्या संचारबंदी - नाकेबंदीने शासनाने मंदिर, सण उत्सवांना सक्त मनाई केली होती व कारंजेकरांनी सुद्धा शासन निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून शासनाचा सन्मान राखला होता . आता कोरोना महामारीमधून आपण सुखरूप बाहेर पडल्याने शासनाने प्रत्येक सण उत्सवाला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे कारंजेकर मातृशक्ति उपासक यांच्या आनंदाला उधाण आलेले असून, कारंजा शहरामध्ये यावर्षी श्री नवदुर्गा उत्सवाची जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे . महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेच्या सदस्यांनी शहरामध्ये फेरफटका मारला असता, प्रत्येक वार्ड, वसाहती, मोहल्ल्या मध्ये मातृशक्ती उपासक बंधू भगीनी श्री नवदुर्गा देवी व श्री शारदा देवी च्या घटस्थापने करीता तयारी करीत असून,श्री नवदुर्गोत्सव मंडळांकडून मोठमोठे मंडप उभारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्याच प्रमाणे श्री नवदुर्गोत्सव मंडळातर्फे ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यक्रमाची मांदियाळी सुद्धा असणार आहे. श्री नवरात्री उत्सवात ठिकठिकाणी दांडीया, गरबा, लेझिम, भजन, पूजनाचे सुद्धा आयोजन होणार असल्याचे कळते. शिवाय कारंजा नगरीत श्री नवदुर्गो उत्सवा निमित्त ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान सुद्धा होत असल्याने ठिक ठिकाणी महाप्रसादाच्या जेवणावळी सुद्धा होत असतात. याशिवाय कारंजा नगरीत श्री एकविरा देवी संस्थान माळीपुरा, श्री यक्षिणी देवी संस्थान हटोटीपूरा, श्री चंद्रावळी देवी संस्थान, लोकमान्य नगर, श्री रेणुका देवी संस्थान भारतीपूरा, श्री जगदंबा देवी संस्थान कासारओळ, अमरचौक ही प्राचिन संस्थान असून, श्री महाकाली संस्थान, जुने विठ्ठलमंदिर, श्री नवशक्ति धाम सिंधी कॅम्प, विर भगतसिंग व्यायाम मंडळाचे जगजननी मॉ मंदिर, श्री जगदंबा गुजराती समाज मंदिर, श्री तुळजा भवानी मंदिर, श्री वनदेवी मंदिरं असून, ह्या सर्वच मंदिरांमध्ये रंगरंगोटी, सजावट व विद्युत रोषनाईची कामे मोठया प्रमाणात सुरु असून, श्री नवरात्रोत्सवा मध्ये नारीशक्तीची उपासना केल्या जात असल्याने महिला मंडळीमध्ये सुद्धा विशेष उत्साह आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे वृत्त, जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसारमाध्यनाकडे दिले आहे.
Updated : 23 Sep 2022 6:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top