एस पी भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक झाली साजरी
Peace Committee meeting was held under the chairmanship of SP Bhujbal Saheb

घाटंजी पोलीस स्टेशन येथे दी. १७/२ ला दुपारी दोन वाजे दरम्यान शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यात एस डी पी ओ प्रदीप पाटील यांनी शांतता समितीच्या बैठकीत जनतेला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील भुजबळ होते कार्यक्रमाचे पाहुणे तहसीलदार पूजा माटोडे,न परीषदेचे अमोल माळकर, न.प अध्यक्ष नैना ठाकूर, बांधकाम विभाग धांदे साहेब , विद्युत विभाग नगराळे साहेब, पंं समीती बी डी ओ सोनाली माळकर, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती हजर होती.
कार्यक्रमात एस पी भुजबळ साहेबांनी जनतेला मार्गदर्शन करतांना सांगितले की आता समोर येण्यार्या धार्मिक सणाचे कार्यक्रमाचे नियोजन हे शासनाच्या नियमाप्रमाणे शातंतेतच व्हायला पाहिजे यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन केले यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्यांवर संपूर्ण आळा बसविला आहे कुठे असा प्रकार दीसून आला तर त्याला संपूर्ण पणे ठाणेदार च जवाबदार असेल असे ठणकावून सुध्दा सांगितले जातीय सलोखा टीकवूनच सगळे धार्मिक कार्यक्रम यशस्वी होत असते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मणीष दिवटे ह्यांनी आटोकाट प्रयत्न केला ह्या कार्यक्रमात वडगाव जगंल पोलीस स्टेशन चे ठाणेदार पवन राठोड तसेच शांतता समितीची सर्व सदस्य गावातील मान्यवर मंडळी पत्रकार मंडळी ऊपत्सित होती कार्यकर्त्यांची सांगता ठाणेदार मणीष दिवटे यांनी केली.
संजय ढवळे घाटंजी
यवतमाळ