Home > Latest news > पतंजली योगशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार योग शिबिरांचा २०,३९६ नागरीकांनी घेतला लाभ ७ दिवसीय ७० शिबिरे संपन्न

पतंजली योगशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार योग शिबिरांचा २०,३९६ नागरीकांनी घेतला लाभ ७ दिवसीय ७० शिबिरे संपन्न

Patanjali yoga teachers felicitated with badge of honour 20,396 citizens benefited from yoga camps 70 7 day camps completed

पतंजली योगशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार    योग शिबिरांचा २०,३९६ नागरीकांनी घेतला लाभ    ७ दिवसीय ७० शिबिरे संपन्न
X






चंद्रपूर २४ मे - चंद्रपूर महानगरपालिका व पतंजली योग समितीद्वारे आयोजीत योग प्राणायाम शिबिरांत निःशुल्क सेवा देऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या योगकर्मींचा सत्कार २४ मे रोजी मनपा सभागृहात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्त चंद्रपूर अभियानाची सुरवात २२ जानेवारी पासुन करण्यात आली होती. स्वस्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती,रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी ७० योग प्राणायाम शिबिरे चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती. या ७ दिवसीय निःशुल्क शिबिरांतर्गत १९८७ योगसत्र घेण्यात आले ज्याचा लाभ एकुण २०,३९६ नागरीकांनी घेतला आहे. शिबिरांद्वारे महीला व पुरुष मिळुन एकूण १५२ सहयोग शिक्षक तयार झाले आहे जे योगाचा प्रसार करण्यास मदत करतील.

या योग शिबिरांत निःशुल्क सेवा देऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या योगकर्मींना मनपाद्वारे भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक योगसत्रे घेणाऱ्या योगशिक्षक सुधाकर शिरपूरवार व सपनकुमार दास, महीला योगशिक्षिका नसरीन शेख - स्मिता रेभनकर यांचा तसेच पालिका वैद्यकीय अधिकारी म्हणुन सर्वाधिक योगसत्रे आयोजीत करणाऱ्या डॉ. नयना उत्तरवार व डॉ.अश्विनी भारत यांचाही सत्कार कार्यक्रमात करण्यात आला.

सर्व योगशिक्षक व योगशिक्षिका यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विजय चंदावार,स्मिता रेभनकर,डॉ.गोपाल मुंदडा,सपनकुमार दास यांनीही आपले मनोगत व्यक्त करून योग प्रचार करण्यास व नागरीकांचे आरोग्य चांगले ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानले.

याप्रसंगी डॉ.विजया खेरा,डॉ. जयश्री वाडे,डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शरयु गावंडे,डॉ.आरवा लाहिरी,डॉ. नरेंद्र जनबंधू, डॉ. अतुल चटकी,डॉ. शुभंकर पिदूरकर,अंजली साटोणे, स्मिता रेभनकर,नसरीन शेख, अपर्णा चिडे,ज्योती मसराम,विजय चंदावार,कविता मंघानी ,रमेश ददभाल,सपना नामपल्लीवार,नीलिमा शिंदे,ज्योती राऊत, कल्याणी येडे व पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थीत होते.

आयुक्त विपीन पालीवाल - इतक्या मोठ्या प्रमाणात योग शिबिरे आयोजीत करणारी चंद्रपूर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका असावी. पतंजली योग्य समितीचे सहकार्याबद्दल आभार. आज मानसिक,शारीरिक,भावनिक सामाजीक,अध्यात्मिकदृष्ट्या जो स्वस्थ असतो त्याला खरी स्वस्थ व्यक्ती म्हणता येईल.योगाद्वारे ही स्वस्थता मिळविता येते. योग ही भारताची जगाला देणं आहे, आज अनेक लोकांनी अनेक रूपात योगाचा स्वीकार केला आहे.आपण सर्व प्रदुषित वातावरणात राहत असल्याने सर्वांना योग करणे गरजेचे आहे.अशीच शिबिरे प्रत्येक तालुक्यात घेण्यात यावे या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

Updated : 25 May 2023 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top