Home > Latest news > पद्मश्री ना.चं. कांबळे यांचा सत्कार

पद्मश्री ना.चं. कांबळे यांचा सत्कार

Padma Shri Na.Ch. Kamble felicitated

पद्मश्री ना.चं. कांबळे यांचा सत्कार
X

फुलचंद भगत

वाशिम : भारत सरकारचा सर्वोच्च पद्मश्री सन्मान वाशीम जिल्ह्यातून प्राप्त करणारे एकमेव ना.चं. कांबळे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. साहित्य व शिक्षण सेवेबद्दल त्यांचा हा गौरव झाल्याने वाशीम जिल्हयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवल्याबद्दल मुंबई मनपा सदस्य संजुभाऊ आधार वाडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला. सोबतच मार्च महिण्यात त्यांचा वाशीम येथे नागरी सत्कार समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित केले. यावेळी साहित्यीक कांबळे यांनी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर लिखान करून राष्ट्रीय हितासाठी त्यांचे विचार सारखे असल्याचे कथन केले. अशा प्रकारचा विचार लेखनीतून प्रथमच आपल्या माध्यमातून पुढे आला आहे. सोबतच दलित साहित्यामध्ये विधवा महिलांवर आजपर्यंत कोणीही कथासाहित्य लिहले नाही. यावर लिखान करणारे आपण एकमेव असून आपल्या जमेची बाजू होती. आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शंभर कथा आपण लिहल्याचे सांगीतले. कार्यक्रमाला निलेश सोमाणी उपस्थित होते.

Updated : 19 Feb 2022 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top