मंगरूळपीर येथे सेवा भागवत सप्ताहाचे आयोजन
Organizing Seva Bhagwat Week at Mangrulpeer
X
फुलचंद भगत
वाशिम:-समाज बंधु स्व. शंकरलालजी बजाज यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त स्व. शंकरलालजी बजाज जीवनगौरव समिती व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र बजाज यांच्या संकल्पनेतून विविध सेवाभावी कार्यक्रम आयोजित केलेले आहे. महेश नगर मंगरूपीर येथील प्रभाशंकर निवासात 18 फेब्रुवारी 25 फेब्रुवारी पर्यंत चालणार्या या कार्यक्रमात भागवत सप्ताहा सोबतच मूक जनावरांसाठी निशुल्क पाण्याचे टाके वाटप, 7 दिवसापर्यंत रोज तुलादान करून गरजूंना वाटप,केशव गोरक्षण येथील गायीना विविध प्रकारचे फळे पालेभाज्या खाऊ घालून अन्नकूट, ब्लड डोनेशन कॅम्प ,समाजातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सन्मान, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान, तसेच मंगरूळपीर येथील विविध सेवाभावी संस्थांचे सन्मान करण्याचे आयोजित करण्यात आलेले आहेत.
शोभायात्रा शुक्रवार 18 तारखेला दुपारी 1 वाजता श्री चारभुजानाथ मंदिर येथून महेश नगर येथे जाणार आहे व महाप्रसादाचे आयोजन 25 फेब्रुवारीला केलेले आहे तरी या सेवा भागवत सप्ताह चा लाभ भाविकांनी घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे केलेली आहे.