Home > Latest news > आ.समिर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन..

आ.समिर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन..

Organizing a review meeting under the chairmanship of MLA Samir Kunawar.

आ.समिर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन..
X

हिंगणघाट प्रतिनिधी सचिन ठरकर

हिंगणघाट/समुद्रपूर,दि. ८

येत्या उन्हाळ्यात जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीने आपल्या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रस्ताव तात्काळ पंचायत समितीला सादर करावे असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी आज दि.८ रोजी आढावा सभेच्या वेळी केले.

प्रत्येक गावातील अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी आवाहन केले असून वनविभाग, गावठाण तसेच वनजमिनीवरती केलेल्या अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी जिल्हाधिकारी, वन विभाग अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आढावासभेचे आयोजन समुद्रपूर पंचायत समिती सभागृहात करण्यात आले.

आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सरिता विजय गाखरे,जि. प. सभापती माधव चंदनखेडे,श्रीमती मृणाल माटे,माजी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, पंचायत समिती सभापती सौ सुरेखा कैलास टिपले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपरोक्त आढावा सभेत ७२ ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींसह पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे, जिल्हा परिषद सदस्य रोशन चौखे, जिल्हा परिषद सदस्य सौ शुभांगी संजय डेहणे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री चौखे, पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे, पंचायत समिती सदस्य श्री सुनील डुकरे, पं. स. सदस्य शांताराम बगडे, प. स. सदस्य कांचन मडकाम, प. स. सदस्य पुष्पा राजू जुनघरे, प. स. सदस्य पुष्पांजली किशोर नेवल, तहसीलदार राजू रणवीर, जिल्हा परिषदेचे अधिकारी सत्यजित बडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. पावडे, उपअभियंता एस.आर.फटिंग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे श्री वाघ, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा तसेच सर्व ग्रामसेवक, सरपंच व महाआवास योजनेचे तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

यावेळी महाआवास अभियाना अंतर्गत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. समुद्रपुर पंचायत समिती अंतर्गत ८४९ उद्दिष्ट असून यातील ८२४ प्रकरणात शासनातर्फे मंजुरी प्रदान करण्यात आली आहे तर पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत २०१६ -१७ पासून आज पावेतो १०९७ प्रकरणात मंजुरी मिळाली असून यात १४०९ हे उद्दिष्ट होते प्रलंबित प्रकरणी पुढे पाठपुरावा करण्याचे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

Updated : 9 Feb 2022 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top