मालमत्ता करात शास्ती माफीची पुन्हा संधी १५ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के, १६ ते २८ फेब्रुवारी ७५ टक्के, तर १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार लाभ घेण्यासाठी कोविड लस घेणे अनिवार्य
Opportunity for property tax waiver 100% discount till 15th February, 75% discount from 16th to 28th February and 50% discount from 1st to 15th March It is mandatory to take Kovid vaccine to get the benefit
X
चंद्रपूर, ता. ३१ : १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शहरातील नागरिकांना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली. या योजनेचा लाभ शहरातील मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या योजनेस मुदतवाढ देत पुन्हा संधी दिली आहे. १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के, १६ ते २८ फेब्रुवारी ७५ टक्के, तर १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार आहे. ही सूट कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच लागू राहील, असे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे.
कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शासनाकडून माहे मार्च २०२० पासून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले. त्या काळात व्यापार व व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग आणि समाजाचे घटक कामगार वर्ग यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे थकीत कराचा भरणा करता आला नाही. अशा घटकांना दिलासा देण्यासाठी १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली. महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून सन २०२०-२१ पर्यंतचा थकीत मालमत्ता कर व इतर कर तसेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व इतर करांचा दिनांक १० जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये १००% सूट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा शहरातील नागरिकांनी मोठा लाभ घेतला. त्याची मुदत ३१ जानेवारी रोजी संपली. या योजनेचा लाभ आणखी जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी आयुक्तांनी पुन्हा मुदतवाढ देत दिलासा दिला आहे.
• वेबसाईट : - chandrapurmc.org
• संपर्क क्र. : - 07172 - 250220
--