चंद्रपूर मनपात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कायाकल्प या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
One day workshop on rejuvenation under National Civil Health Mission in Chandrapur Municipal Corporation


चंद्रपूर | शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत एकदिवशीय कायाकल्प कार्यशाळा घेण्यात आली. मंचावर मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. प्रकाश साठे यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवेला महत्व आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. नियोजन, अमलबजावणी, त्रुटींची तपासणी आणि पुनर्रअंमलबजावणी हे सूत्र राबवून विश्वासार्ह सेवा देण्याचे आवाहन डॉ. प्रकाश साठे यांनी केले. या प्रसंगी मनपाचे शहरी कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू यांनीही पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
यावेळी मनपाच्या सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.