प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा स्वाभिमान पक्ष शहर राजुरा च्या महिला आघाडीचे सफलतापूर्वक गठण
On the occasion of Republic Day, Yuva Swabhiman Paksha successfully formed the Women's Front of Rajura


आज दिनांक 26/01/2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टी राजुरा तर्फे सस्नेह मिलन सोहळा, महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळासह वान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये महिलांनी आवर्जून सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तथा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. सोनालीताई सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. व याच बरोबर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिला व पुरुषांनी युवा स्वाभिमान पक्षातर्फे जनतेच्या समस्या सातत्याने पारदर्शकपने मार्गी लावण्याच्या कार्याला प्रेरित होऊन स्व इच्छेने या कार्यक्रमा दरम्यान प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त करीत युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या हस्ते इच्छुकांनी यावेळेस युवा स्वाभिमान पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला. तथा या वेळेस काही नवनियुक्त प्रवेशकर्त्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. व गोरगरीब जनतेचे, जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता युवा स्वाभिमान परिवार सदैव सोबत राहील असे वचन यावेळेस जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी दिले. यावेळेस प्रवेश केलेल्या युवक-युवती महिलांचा नावे सारंग हारघोडे, प्रफुल उरकुडे, स्वप्नील देहरकर, मयूर कष्टी, शुभम रोडे, सौ.विशाखा चींतल, सौ. रिता तुराणकर, सौ. अर्चना भोंगळे, सौ.स्वाती पुणेकर, सौ. रेखा पुणेकर,सौ छाया मडावी, सौ. पुष्पा सीडाम सौ .रंजना टेकाम व सौ शोभा मडावी यांनी प्रवेश केला तसेच या कार्यक्रमाला बल्लारपूर विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष प्रिया ताई झांबरे, संगीता वनकर, राहुल भाऊ चौहान जिल्हा मीडिया प्रमुख,मोहब्बत खान कोरपना तालुका अध्यक्ष, नागेश भाऊ इटेकर गोंडपिपरी तालुका अध्यक्ष, श्री. सुधाकर काळे विहिरगाव शाखा प्रमुख, सौ. सुनीता नांदलवार बल्लारपूर महिला आघाडी शहर अध्यक्ष, राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, मोरेश्वर भोंगळे शहर सहसचिव, पवन चींतल विधानसभा सचिव, शोएब शेख अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष, आल्विन सावरकर युवा आघडी शहर अध्यक्ष, वतन बक्सरिया युवा आघडी शहर सचिव, राज टाक युवा आघडी शहर उपाध्यक्ष, रामपूर शाखा प्रमुख राहुल मडावी, माना मल्लेपल्ली विद्यार्थी युवा आघाडी अध्यक्ष, श्री. प्रभाकर भाऊ चन्ने, भूपेश साठोने उपस्थित होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व तसेच राजुरा नगरीत राजुरा टी पॉइंट येथे राजुरा युवा स्वाभिमान पक्षातर्फे स्वागत या आशयाच्या फलकाचे अनावरण युवा समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले.
तसेच आज सौ. विशाखा प. चिंतल यांची राजुरा महिला आघाडी शहर अध्यक्ष , सौ. अर्चना मो. भोंगळे शहर महिला आघाडी राजुरा सचिव, सौ. रिता तुरणकर राजुरा महिला आघाडी शहर उपाध्यक्ष, श्री. पवन चिंतल राजुरा विधानसभा सचिव, श्री. प्रफुल उरकुडे शहर उपाध्यक्ष व श्री. माना माल्लेपली विद्यार्थी युवा आघाडी शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल सर्वांचे राजुरा युवा स्वाभिमान पार्टी राजुरा शहर तर्फे हार्दिक अभिनंदन...