Home > Latest news > रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली आणि माॅऊट विज्ञान महाविद्यालयाचे वतीने भारतीय गणराज्यदिनाचा ७२ वा वर्धापन दीन संपन्न

रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली आणि माॅऊट विज्ञान महाविद्यालयाचे वतीने भारतीय गणराज्यदिनाचा ७२ वा वर्धापन दीन संपन्न

On behalf of Ramabai Ambedkar Vidyalaya and Junior College Shadow and Mount Science College, the 72nd anniversary of the Republic of India was celebrated.

रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली आणि माॅऊट विज्ञान महाविद्यालयाचे वतीने भारतीय गणराज्यदिनाचा ७२ वा वर्धापन दीन संपन्न
X


*योगेश रामटेके

ता.प्र.सावली*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष मान. के.एन. बोरकर साहेब यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी संस्था सचिव मान.व्ही.सी.गेडाम मॅडम, संचालक मान.बी.के.गोवर्धन साहेब,व्ही.के.बोरकर साहेब,मान.सौ.सी.आर. गेडाम मॅडम, प्राचार्य एन.एल.शेंडे, प्र.पाचार्य पी.जी.रामटेके, विद्यालयाचे पर्यवेक्षक एम.डी. लाकडे सर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करतांना प्राचार्य शेंडे म्हणाले की,१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या अथक लढ्याने आणि बलीदाने जरीस्वातंत्र मिळाले तरी यातील विविध जाती धर्मातील , विविध वैधतेने नटलेल्या,विविध बोली भाषेच्या लोकांना समता स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय मीळावा यारिता बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर भारताचे बहुमोल असे संविधान लीहून १९४९ रोजी भारताला सोपविले आणि खऱ्या अर्थाने २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात लोकांनी लोकांकरिता चालवीलेले राज्य म्हणून आपण त्याचा स्विकार करून आज आपला भारत देश स्वाभिमानाने उभा आहे हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने शक्य झाले हे नाकारून चालणार नाही या दिनाचे औचित्य साधून संचालक मंडळातील वयोवृध्द संचालीका मान. सौ चंद्रभागाबाई गेडाम यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच विद्यालयातील होतकरू,मेहनती,कर्तव्यदक्ष, विद्यार्थ्यांवर ठसा उमटविणारे, विद्यार्थी प्रीय, प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक मान.पी.एन.कन्नाके.,एच.आर कस्तूरे,ए..टी.मेश्राम,आर.कोसनकर,वरिष्ठ लिपीक एस.वाय.गेडाम, शिपाई विनोद जूकनाके यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.के.एन.बोरकर साहेब यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनीकाना वंदन करून गणराज्य दिनाच्या सूभेच्छा देऊन सन्मानित केलेल्या शिक्षकांचा आदर्श ठेऊन आपल्यापेशाप्रती निष्ठापूर्वक कार्य करुन शाळेची प्रगती साधावी यांचे आव्हान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एल. बन्सोड सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन कु.सी.एस.रायपूरे यांनी केले.

Updated : 26 Jan 2022 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top