Latest News
Home > Latest news > गेल्या 24 तासात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या 24 तासात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

Nine coronavirus positive cases in last 24 hours

गेल्या 24 तासात नऊ कोरोना पॉझिटिव्ह
X

गेल्या 24 तासात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 23 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यात दारव्हा तालुक्यातील चार, मारेगाव एक, नेर दोन, राळेगाव एक व यवतमाळ येथील एका रूग्णांचा समावेश असून त्यापैकी एक महिला व आठ पुरूष आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 580 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 571 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79095 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77271 आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 18 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 21 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 78 हजार 792 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 99 हजार 697 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.0 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.55 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.

नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून पुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Updated : 23 Jun 2022 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top