सायफळ ग्रामपंचायतीचे गावाचा विकास कामाकडे दुर्लक्ष.
Neglect of village development work of Saiphal Gram Panchayat.
X
म मराठी न्युज नेटवर्क
माहूर तालुक्यात दुर्गम भागात येत असलेल्या सायफळ ग्रामपंचायत मागील एका वर्षापासून प्रशासक काळ लागू होता मागील तीन ते चार महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माणिकराव दामोदर शेंडे पॅनल प्रमुख यांचा संपूर्ण पॅनल निवडून आला आहे. पण गावातील सरपंच उपसरपंच यांचे गावाच्या विकास कामाकडे 2.महिने होत असतानाही विकास कामाला अजून सुरुवात केलेली दिसत नाही आहे गावांमधील सांडपाण्याची विल्हेवाट ग्रामपंचायत कधी लावणार.मागील पंचवीस वर्षापासून काही सत्ताधाऱ्यांच्या हातात ग्रामपंचायत होती पण यंदाच्या वर्षी थेट जनतेतून सरपंच असल्याने युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता पेसा अंतर्गत असलेल्या सायफळ ग्रामपंचायतीवर एसटी प्रवर्गत गटातील महिला राखीव जागा असल्याने सायकल गावात ग्रामपंचायत निवडणूक मध्ये रेखाताई रमेश कुमरे यांना गावातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळवून भरघोस मतांनी ते विजय झाल्या. सरपंच रेखाताई कुमरे यांनी उपसरपंच कपिल दादा शेंडे यांनी
गावांमध्ये रस्ते नाल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. कारण 25 वर्षापासून मागील ग्रामपंचायतीने गावामध्ये कोणतेच विकास कामे केली नाही यावर्षी नवीन पोरांच्या हातात गाव दिले आहे आता तुम्ही गावाचा विकास करून गावांमध्ये विविध योजना आणून गावाचा विकास करावा हीच अपेक्षा आहे असे मत सायफळ गावातील नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.