Home > Latest news > विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सौ.अंजुताई चिलोरकर यांची निवड करण्यात आली.

विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सौ.अंजुताई चिलोरकर यांची निवड करण्यात आली.

Mrs. Anjutai Chilorkar was elected as the District President of Vidarbha State Andolan Samiti Yavatmal.

विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सौ.अंजुताई चिलोरकर यांची निवड करण्यात आली.
X

विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सौ.अंजुताई चिलोरकर यांची निवड करण्यात आली.

--------------------------------------------------------------

विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ महिला शाखा जिल्हा अध्यक्ष सौ अंजुताई चिलोरकर यांची नियुक्ती मासिक मिटींग मध्ये एक मताने करण्यात आली. मासिक सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भवादी नेते मा.ॲड.वामनराव चटप (माजी आमदार ) मा.रंजनाताई मामर्डे अध्यक्ष विदर्भ प्रांत (महिला आघाडी )मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती ह्यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेच्या प्रास्ताविक विषयाची मांडणी मांडणी मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केली आणि महत्वपूर्ण विषय १)दिनांक २८फेब्रुवारी २०२२ नागपूर येथे मानवी श्रृंखला आंदोलन २)११मार्च२०२२ ला केंद्रीय कार्यालय नागपूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन ३) ७ एप्रिल २०२२ ला दिल्ली येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि मार्गदर्शन करण्यात आले होते.

मासिक सभेत विदर्भ राज्य आंदोलन समिती मध्ये स्वयंस्फूर्तीने कामं करण्याची अनेक व्यक्ती ने इच्छा व्यक्त केली त्यांना विदर्भाचा बिल्ला लावून सन्मान करण्यात आला आणि नियुक्ती पत्र देण्यात आले होते त्यात प्रामुख्याने मा.दिवाकरराव भोयर, सुनिल इखार संजय चौधरी मा मधुकर निस्ताने इंगोले मॅडम दिक्षा नगराळे समिर शिंदे यांचा समावेश होता.

सभेच्या आयोजनात पुढाकार आणि सहकार्य अशोकराव कपिले जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती शहर अध्यक्ष ॲड अजय चमेडीया अरुण भाऊ जोग अध्यक्ष जय विदर्भ पार्टी यवतमाळ श्रीधर ढवस अशोकराव कारमोरे प्रल्हाद काळे सोनाली मरगडे लताताई जयस्वाल चारुदत्त नेरकर गौतम साहेब गजानन चौधरी सर्व सहभागी सदस्यांच्या उपस्थितीत मासिक सभा पार पडली.

सभा संपल्यानंतर नियोजित पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

Updated : 16 Feb 2022 7:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top