Home > Latest news > महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांची डम्पिंग यार्डला भेट - आत्मनिर्भर वॉर्ड व स्वछ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत चंद्रपूर मनपाचा उपक्रम

महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांची डम्पिंग यार्डला भेट - आत्मनिर्भर वॉर्ड व स्वछ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत चंद्रपूर मनपाचा उपक्रम

Members of the Women's Self Help Group visit the dumping yard - Initiative of Chandrapur Municipal Corporation under Atmanirbhar Ward and Swachh Survey 2022


चंद्रपूर, ता २५ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आत्मनिर्भर वॉर्ड भेट उपक्रमाअंतर्गत ओला कचरा प्रक्रियेसंदर्भात जाणून घेण्याकरिता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांनी दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी डम्पिंग यार्डला भेट दिली.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२२ तसेच आत्मनिर्भर वॉर्ड अभियानाअंतर्गत शहरातील विविध बचत गटाच्या महिला सदस्यांनी कंपोस्टिंग डेपो (डम्पिंग यार्ड) येथे भेट दिली. मानिक महिला अल्प बचत गट, अनु महिला अल्प बचत गट, मीनाक्षी महिला अल्प बचत गट या बचत गटाच्या ४०-४५ महिला सदस्यांचा त्यात समावेश होता.

यावेळी सदर महिलांना ओला कचऱ्यापासून कंपोस्टिंग प्रक्रियेची माहिती, प्लास्टिक कचरा विलगीकरण प्रक्रियेवर सविस्तर माहिती देण्यात आली.

Updated : 25 Jan 2022 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top