आज महीला बचत गटाचा मेळावा किशोर तिवारी यांची उपस्थिती
Meeting of Women's Self Help Group today Presence of Kishore Tiwari
M Marathi News Network | 11 Feb 2022 8:21 PM GMT
X
X
प्रतिनिधी यवतमाळ
दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता सुराणा भवन पांढरकवडा येथे तालुक्यातील महीला बचत गटाचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. त्यामध्ये महिलांना कौशल्य विकास स्टार्टअप सुरु करण्याच्या संधी, आर्थीक सबलीकरणासाठी सरकारच्या योजना, बँकेचा पतपुरवठा या विषयावर एड श्रीमती पारोमिता गोस्वामी सह अनेक तज्ञ मार्गदर्शन करणार आहे.
या मेळाव्यात स्टेट बँकेचे व अग्रीम बँकेचे अधिकारी, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक यांचे पांढरकवडा येथील व्यवस्थापक, महिला बालकल्याण विकास विभागाचे अधिकारी, उमेद, जिल्हा परिषद यवतमाळचे अधिकारी, कौशल उद्योजकता विभाग यवतमाळ, मुख्याधिकारी नगर परिषद पांढरकवडा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. याठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या महीला विकासाच्या योजनांचा आढावा सुध्दा घेण्यात येणार आहे.
Updated : 11 Feb 2022 8:21 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire