Home > Latest news > माहूर तालुक्यातील सिंदखेड येथे शहीद दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त शाहिदाना श्रद्धांजली व रक्तदान शिबिर...!

माहूर तालुक्यातील सिंदखेड येथे शहीद दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त शाहिदाना श्रद्धांजली व रक्तदान शिबिर...!

Martyr's tribute and blood donation camp at Sindkhed in Mahur taluka on the occasion of Martyr's Day and Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti and Sant Sewalal Maharaj's joint Jayanti ...!

माहूर तालुक्यातील सिंदखेड येथे शहीद दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त शाहिदाना श्रद्धांजली व रक्तदान शिबिर...!
X

माहूर तालुका प्रतिनिधी- रुपेश मोरे पाटील

दि 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-कश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर जवळजवळ 2600 जवानांना घेऊन जाणाऱ्या 78 बसमध्ये सीआरपीएफचे जवान होते.

पुलवामा येथे जवान पोहचले असता तेव्हाच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका कारने सीआरपीएफच्या ताफ्यासोबत चालणाऱ्या वाहनाला धडक दिली. समोर आलेल्या एसयुवी जशी ताफ्याला धडकली असता मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 शूरवीर जवान शहीद झाले.

या निमित्त सिंदखेड येथे शहीद दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी एकूण 71 रक्तदात्यांनी रक्तदान करून शाहीदना श्रद्धांजली अर्पण केली.

ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक मेडल देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंदखेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके व उद्घाटक वैधकीय अधिकारी श्रीमती केंद्रे मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून

चंदेल सर,पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड,डॉ.विजय जाधव,संदीप नाईक,अरविंद खडके,पडोळे सर,पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन गुव्हाडे,पोलीस कॉन्स्टेबल संघरत्न सोनसळे पत्रकार शेख जावेद तथा पत्रकार रुपेश मोरे यांची उपस्थित होती.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महेश कोटूरवार व अफरोज शेख यांनी केले.

Updated : 15 Feb 2022 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top