Home > Latest news > महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषित

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषित

अध्यक्षपदी आरिफ पोपटे सचिवपदी गणेश बागडे यांची निवड

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची कार्यकारिणी घोषित
X

फुलचंद भगत

वाशिम:-महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची बैठक नुकतीच स्थानिक विश्रामगृह कारंजा येथे संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार बंडूभाऊ इंगोले होते तर प्रमुख उपस्थिती एकनाथ पवार ,दादाराव बहुटे, प्रभाकर सोमकुवर ,यांची उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना कायम पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय प्रस्थापित करणारे राज्यातील एकमेव संघटना आहे त्यामुळे कारंजा तालुक्यातील पत्रकारांना संघटित करून ही संघटना मजबुतीने सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम करेल. पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरावर कार्यरत आहे तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले, मिळणाऱ्या धमक्या यासाठी पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून पत्रकारांची ताकत ठरलेले संघटन म्हणजे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ आहे तेव्हा या संघटनेत सर्व पत्रकार बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन बंडूभाऊ इंगोले यांनी केले.यावेळी कारंजा तालुक्याची कार्यकारणी ठरविण्यात आली. त्यात अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार आरिफ पोपटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून एकनाथ पवार, रामदास मिसाळ, सचिव गणेश बागडे संघटक अशिष धोंगडे कार्याध्यक्ष दादाराव बहुटे सहसचिव मोहम्मद मुन्नीवाले,जिंनवर तायडे, तर सभासद सभासद म्हणून कालूभाई तवनगर, प्रभाकर सोमकुवर,शेषराव वरठी ,विनोद नंदागवळी आसिफ खान राजेश वानखडे मयूर राऊत प्राध्यापक सीपी सेकुवाले, दिगंबर सोनवणे पवन कुमार देशमुख सागर अंभोरे विलास राऊत हार्दिक पिंजरकर प्रभू जाधव विलास खपली, उषा नाईक ,मयुरी गुप्ता, महेंद्र गुप्ता, संजय खेडकर ,साजिद शेख, संतोष दगडे ,गजानन मेसरे, भारत, भगत विश्वास कुठे आदींची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी एकनाथ पवार प्रभाकर सोमकुवर यांनी मनोगत व्यक्त केले तर नवनिर्वाचित अध्यक्ष आरिफ पोपटे यांनी निवडीबद्दल उपस्थितांचे आभार मानले. आरिफ पोपटे व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार दिगंबर काळेकर यांना श्रद्धांजली देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन आशिष धोंगडे यांनी तर आभार गणेश बागडे यांनी मानले.




Updated : 19 Feb 2022 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top