Home > Latest news > घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली *लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त- विवेक बोढे*

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली *लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त- विवेक बोढे*

M.A. from Ghughhus. A heartfelt tribute to Empress Lata Mangeshkar at Sudhirbhau Mungantiwar Seva Kendra * With the departure of Latadidi, the conscience of Svarasura- Vivek Bode *

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली    *लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त- विवेक बोढे*
X




सोमवार 7 फेब्रुवारीला घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी लतादीदींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

रविवारला सकाळी स्वरलता, गानकोकिळा, गानसरस्वती अशा अशा अनेक विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला.

याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले लतादीदींनी संगीतजगताला आपल्या सुरांनी सजविले आपल्या आवाजामुळे रसिकांना मंत्रमुग्ध केले अवघ्या वयाच्या १३ व्या वर्षा पासून गायनाला सुरुवात केली. त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, फिल्मफेयर, नॅशनल फिल्मफेअर, असे अनेक पुरस्कार मिळाले. लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त झाला.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी पंस.उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, भाजपाचे विनोद चौधरी, अमोल थेरे, संजय भोंगळे, मल्लेश बल्ला, शरद गेडाम, गणेश खुटेमाटे, सिनू कोत्तूर, सुशील डांगे, पियुष भोंगळे, राजेंद्र लुटे, मधुकर धांडे, मंगेश राजूरकर, सय्यद मुस्तफा, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, लता आवारी, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, भरती परते, खुशबू मेश्राम, अजय लेंडे, उमेश दडमल उपस्थित होते.

Updated : 7 Feb 2022 4:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top