Home > Latest news > म. गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी पंकज म्हात्रे यांची निवड

म. गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी पंकज म्हात्रे यांची निवड

M. Election of Pankaj Mhatre as the Chairman of Gandhi Tantamukti Samiti

म. गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी पंकज म्हात्रे यांची निवड
X


जयेश पाटील : सफाळे पश्चिम प्रतिनिधी

पालघर तालुक्यातील माकुणसार ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवार दि. ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडली. सदर ग्रामसभेत म. गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कै. सुभाष वर्तक यांच्या अपघाती निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या ,जागेवर सामाजिक कार्यकर्ते पंकज म्हात्रे यांची एकमताने निवड झाली. पंकज म्हात्रे म. गांधी तंटामुक्ती समिती स्थापन झाल्यापासून या समितीत काम करीत आहेत., निस्वार्थीपणे काम करत राहणे व एक वेळ देणारे सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.म्हणूनच तुमची निवड करण्यात आली आहे. नक्कीच त्यांच्या निवडीमुळे प्रश्न मार्गी लागतील असे बोलले जाते .अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.

Updated : 9 Feb 2022 9:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top