Home > Latest news > कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी ढाकणे यांची निवड

कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी ढाकणे यांची निवड

Kōparagāva nagarapālikēcyā svacchatā va paryāvaraṇa dūta padī ḍhākaṇē yān̄cī nivaḍa

कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी ढाकणे यांची निवड
X

कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी ढाकणे यांची निवड


कोपरगाव- स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० करीता कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणून गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व गोदामाई स्वच्छता सेवक आदिनाथ ढाकणे यांची निवड करण्यात असून नुकतेच नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी ढाकणे यांना निवडीचे पत्र ढाकणे यांना दिले आहे.




केंद्र सरकार द्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ होऊन स्वतःहून स्वच्छतेबाबत जनसह भागातून व्यापक चळवळ उभारली जावी यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच राज्य शासनाद्वारे पृथ्वी,जल,तेज,वायू, आकाश या वर आधारित पर्यावरण संरक्षण करीता माझी वसुंधरा अभियान ची सुरुवात करण्यात आली असून या अभियान अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये व्यक्तिगत, नदी स्वच्छता, श्रमदान, कचरा विलगीकरण, कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनविणे, वृक्ष लागवड व संगोपन, पाणी बचत आदी सह पर्यावरण जनजागृती करणे कामी कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने गोदामाई प्रतिष्ठान मार्फत दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातून पवित्र्य अशा गोदावरी नदीची गेल्या तीन वर्षांपासून अविरतपणे स्वच्छता करणारे तसेच नदी किनारी वेगवेगळी देशी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करत त्याचे काळजीपूर्वक संगोपन करत जनमाणसात पर्यावरण विषयक जनजागृती करत विविध सामाजिक उपक्रम घेणारे आदीनाथ ढाकणे यांची निवड करण्यात अली आहे.

Updated : 11 Feb 2022 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top