Home > Latest news > जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगावमाळ,ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगावमाळ,ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

Jil'hā pariṣada prāthamika śāḷā kōḷagāvamāḷa,tā. Sinnara yēthē vidyārthyānnā śālēya gaṇavēśa vāṭapa karaṇyāta ālē

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगावमाळ,ता. सिन्नर येथे   विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
X

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगावमाळ,ता. सिन्नर येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगावमाळ,ता. सिन्नर येथे आज दि.१२/०२/२०२२ रोजी स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष श्री. अन्वरभाई पटेल , स्थानिक स्कुल कमिटी सदस्य श्री. उत्तमभाऊ गोरे ,श्री. किरण चंद्रे यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

गावातील प्राथमिक शाळेत ११० मुले-मुली शिक्षण घेत आहे. कोळगावमाळ येथील जि.प. शाळेत असलेले शिक्षकवृंद खुपच चिकाटीने व जिद्दीने काम करुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहे. गावाच्या आजुबाजुला मराठी व इंग्लिश माध्यमाच्या मोठमोठ्या शाळा आहेत त्यातच गावाची लोकसंख्या कमी असतांना सुध्दा शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक श्री.शरद शेरकर सर,श्रीमती. सोनगडकर मॕडम,श्री. दिपक घाडगे सर, श्रीमती. सुवर्णा थोरात मॕडम हे रात्रंदिवस मेहनत घेऊन काम करत आहे. अशातच त्यांना गावातील तरुणांची साथ मिळाल्यामुळे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, वेगवेगळे उपक्रम राबवुन शाळेचा दर्जा उंचवण्याचे काम गावातील ग्रामस्थ,तरुण व शिक्षक वृंद करीत आहे.

जिल्हा परिषदेकडुन दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले जातात. त्याप्रमाणे आज शाळेत गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच श्री.आयुबभाई शेख, सदस्य श्री. वाल्मीक जुंधारे,श्री.तानाजी ठाकर,श्री. निजामभाई पटेल गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.गणपतराव चंद्रे ,श्री. निवृत्ती चंद्रे, श्री.कैलास ठाकर, युवा नेते श्री. अल्ताफभाई पटेल,श्री. प्रविण धोक्रट,श्री.शशिकांत कदम,श्री. पप्पुभाई शेख, श्री.फिरोज शेख,श्री.गंगाराम बर्डे,श्री.सोएब शेख, श्री. फिरोजभाई पटेल आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 12 Feb 2022 4:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top