मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित
Invites proposals under Madrasa Modernization Scheme
X
यवतमाळ दि. 31, (जिमाका) : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२१-२२ अंतर्गत नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरण प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत . सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसा चालविणा ऱ्या संस्था या धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ज्या मदरसांना केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे.
अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. इच्छुक मदरसांनी शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१३ मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्यात परीपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्यांत यावे. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव कोणत्याही परीस्थितीत ग्राह्य धरले जाणार नाहीत याची कृपया नोंद घेण्यांत यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांनी कळविले आहे.