Home > Latest news > रामनगर अयोध्या पार्क मध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी करून कंत्राटदार व अभियंता वर कारवाई करा.... आम आदमी पार्टी घूग्घुस

रामनगर अयोध्या पार्क मध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी करून कंत्राटदार व अभियंता वर कारवाई करा.... आम आदमी पार्टी घूग्घुस

Investigate the bogus work done in Ramnagar Ayodhya Park and take action against the contractor and engineer.... Aam Aadmi Party Ghooghus

रामनगर अयोध्या पार्क मध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी करून कंत्राटदार व अभियंता वर कारवाई करा.... आम आदमी पार्टी घूग्घुस
X

घुग्घुस स्थित रामनगर प्रभाग क्रमांक ०१ मध्ये अयोध्या इको पार्क बनलेले आहे ज्याचे काम वर्ष २०१८ मध्ये सुरू झाले ज्याची किंमत ९५.२० लक्ष आहे.या पार्क मध्ये नागरिकांना बसण्याकरिता बनविण्यात आलेले शेड पूर्णपणे तुटून खाली कोसळलेले आहे.ज्यामधे कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु हे सर्व पाहता असे लक्षात येते की कुठे ना कुठे बोगस काम झालेले आहे व खूप मोठा भ्रष्टाचार कंत्राटदार एम. एस. भांडारकर व पि. डब्लू. डी. अभियंता यांनी केलेला आहे.

त्यामुळे या पार्कचे काम करणाऱ्या कंत्राटदार व कामाला मंजुरी देनाऱ्या अभियंता यांनी कुठेना कुठे हे बोगस काम केलेले आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर व नगरपरिषद घुग्घुस यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी आम आदमी पार्टी शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी यांनी भ्रष्टाचार विरोधात आम आदमी पार्टी सदैव काम करेल असे सांगितले.

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 21 Sep 2022 10:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top