छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्फूर्ती देणारा - डॉ.मंगेश गुलवाडे उत्तमनगरात शिवजयंती उत्साहात साजरी
Inspiring the history of Chhatrapati Shivaji Maharaj - Dr. Mangesh Gulwade Shiva Jayanti celebrations in Uttamnagar


भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर सचिव चंदन पाल यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगरातील उत्तमनगर परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासन काळातील रयतेची,शेतकऱ्यांची,शुर सरदारांची व धार्मिक स्थळांची अतिशय उत्तम स्वरूपाची व्यवस्था अस्तित्वात होती युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून स्फूर्ती घेऊन देशसेवा करण्यासाठी सदैव तत्पर असायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशा वर्कर,सफाई कामगार,ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला तसेच अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी महापौर राखी कंचर्लावार,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,जेष्ठ नेते तुषार सोम,महामंत्री रवींद्र गुरनुले,बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य,मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे,नगरसेविका शीतल गुरनुले यांच्या सह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती