Home > Latest news > किनवट तालुक्यातील चिखली बु फाटा येथे आकाश गिणगुले यांच्या फ्रेंड्स जिमचे उद्घाटन ..

किनवट तालुक्यातील चिखली बु फाटा येथे आकाश गिणगुले यांच्या फ्रेंड्स जिमचे उद्घाटन ..

Inauguration of Akash Gingule's Friends Gym at Chikhali Bu Fata in Kinwat taluka

किनवट तालुक्यातील चिखली बु फाटा येथे आकाश गिणगुले यांच्या फ्रेंड्स जिमचे उद्घाटन ..
X

किनवट / प्रतिनिधी लखन जाधव

किनवट तालुक्यातील चिखली बु फाटा येथे आकाश गिणगुले यांच्या फ्रेंड्स जिमचे उद्घाटन चिखलीचे सरपंच शेख अमन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले

धावपळीच्या युगात बदलते हवामान तसेच भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसत आहेत त्यातच आरामदायी जगण्यामुळे रक्तदाब,हृदयविकार, मधुमेह यासारखे गंभीर आजार मानवाला जडू लागले आहेत त्यामुळे व्यायाम ही मूलभूत गरज बनली पिळदार शरीरयष्टीची क्रेझ वाढल्यामुळे जिमला विशेष महत्त्व प्राप्त झाले चिखली सारख्या ग्रामीण भागातील तरुण वर्गाला मैदानाऐवजी विविध प्रकारच्या यंत्र व उपकरणाद्वारे अत्याधुनिक पद्धतीने व्यायाम करण्याची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने जिमचे प्रशिक्षक आकाश गिणगुले यांनी तालुक्यातील मौजे चिखली फाटा येथे फ्रेंड्स जिम सुरू केले असून चिखलीचे सरपंच शेख अमन यांच्या हस्ते या जिमचे नुकतेच फित कापून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कांतराव पाटील, निसार भाई, श्याम मगर, बापूसाहेब पाटील, फिरोज भाई, शिवा पवार, नदीम भाई, शंकर गिनगुले,शेख हरून, बाळू भगत, दीपक मस्के, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

निरोगी व सदृढ आरोग्यासाठी व्यायाम करणे हे आता प्रत्येकाची मूलभूत गरज बनली आहे.तरुण वर्ग पिळदार शरीरयष्टीकडे विशेष लक्ष देऊ लागला आहे. आकाश गिनगुले यांनी सुरू केलेल्या फ्रेंड्स जिमच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील तरुणांनाही अत्याधुनिक पद्धतीने व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली असे प्रतिपादन युवा नेते बालाजी बामणे यांनी याप्रसंगी बोलताना केले.कार्यक्रमास चिखली परिसरातील शेकडो युवक उपस्थित होते

Updated : 6 Feb 2022 1:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top