Home > Latest news > जिल्ह्यात रविवारी 282 कोरोनामुक्त तर 129 नवे बाधित ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1026

जिल्ह्यात रविवारी 282 कोरोनामुक्त तर 129 नवे बाधित ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1026

In the district on Sunday, 282 corona-free and 129 newly infected Number of active patients 1026

जिल्ह्यात रविवारी 282 कोरोनामुक्त तर 129 नवे बाधित     ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1026
X

आरती आगलवे

चंद्रपुर तालुका प्रतिनिधि


चंद्रपूर, दि. 6 फेब्रुवारी : जिल्ह्यात गत 24 तासात 282 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 129 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 24, चंद्रपूर 8, बल्लारपूर 7, भद्रावती 8, ब्रह्मपुरी 20,नागभीड 9, सिंदेवाही 1, मुल 4, सावली 14, पोंभूर्णा 1,

गोंडपिपरी 1, चिमूर 6, वरोरा 20,कोरपना 5 तर जिवती येथे 1 रुग्ण आढळून आले असून राजुरा व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 95 हजार 863 झाली आहे. सध्या 1026 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 52 हजार 716 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 52 हजार 360 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1555 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

--

DIO Chandrapur

07172 252515

Visit us on Blog

www.diochanda1.blogspot.in

"निसर्गाचे जतन करा! प्रिंट देण्याअगोदर विचार करा, की प्रिंट देणे आवश्यक आहे का?"

""वृक्षवल्ली, आम्हा सोयरे! वनचरे…""

Updated : 6 Feb 2022 4:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top